आलो होतो भेटायला परवा, ऐकून तुझं स्थानमहात्म्य
परत पावली माघारी फ़िरलो, तू हे असं स्वागत करतोस?
भोळ्या भक्तांना भर-उन्हात रांगेत ताटकळत ठेवतोस
अन धनिकांना अतीविशेष रांगेतून पायघड्या घालतोसका
उगाच गरीबांच्या रोजंदारीचा वेळ वाया घालवतोस
सांगून टाक त्यांना, शेवटी तुही तोलावाच लागतोस
अवघ्या प्राणिमात्रांना प्रेमाची शिकवण देतोस
अन गावच्या जत्रेला बोकडाचा नैवेद्य मागतोस
एका सिताहरणापायी अवघी स्वर्णलंका जाळतोस
दर शनिवारी नारळ देवून फ़सवलेला तुला,
रोजचं शिलहरण उघड्या डोळ्यांनी वेशिवरुन पहातोस
मला काही नको असतं, सगळं तुम्हीच करता
असं म्हणून आपली जबाबदारी झटकतोस
कर्ता -करविता तुच आहेस हे का विसरतोस?
या जगात खरंच तुझं अस्तीत्व आहे काय रे?
अजब विसंगती तुझी,सजीव प्राण्याला बुडवतोस
अन निर्जीव शवास पाण्यावर तरंगत ठेवतोसतु
तरी तुझा दिलेला शब्द तंतोतत कुठे पाळतोस
अवघं जीवन उपभोगून शेवटी पापी आपल्या
कुकर्माची फ़ळ भोगतीलच असं म्हणतोस,
आम्ही इथं उभं आयुष्य नरक-यातना भोगतो
उशीर आहे पण अंधार नाही असं म्हणतोस
पण ती वेळ येण्या आयूष्यच वेचायला लावतोस
अक्रोड देतोस अन दात पाडून वाकूल्या दाखवतोस
पुन्हा मोहक पुर्नजन्माचं गुलाबपाणी शिंपडतोस
मागच्या जन्मीही असंच काहीसं बोलला असशील
पुढच्या जन्मीचं राहू दे, या जन्मीची खात्री देतोस?
खरंच हृदय कनवाळू आहेस काय रे तू?
लेकरांना काय करुणा भाकायला लावतोस.
तुझ्या सारख्या सर्व-शक्तीमान पित्याची मुलं आम्ही,
आम्हाला काय दिनवाने लाचार समजतोस?
कधी कधी मुंगसासारखं क्षणिक अत्तित्व दाखवतोस
पण वारंवार काळ्या मांजरासारखा आडवाच जातोस
सर्व-विश्वव्यापी ना रे तु ? इतका व्यस्त असतोस?
अंधश्रद्धा निर्मुलनाचं काय करायचं ते आम्ही पाहू
तु मात्र भाबड्या श्रद्धेचे बुरुज असे का ढासळतोस
------------भूपेश (२००७-०१)
source - http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=826350&tid=2512323035860549669
owner - http://www.orkut.com/Profile.aspx?uid=2332593117241767121
No comments:
Post a Comment